Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   फारशी   >   अनुक्रमणिका


५१ [एकावन्न]

रोजची कामे, खरेदी इत्यादी

 


‫51 [پنجاه و یک]‬

‫خرید مایحتاج ‬

 

 
मला वाचनालयात जायचे आहे.
‫من می خواهم به کتابخانه بروم.‬
man mikhaham be ketabkhane beravam.
मला पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे.
‫من می خواهم به کتاب فروشی بروم.‬
man mikhaham be ketabforushi beravam.
मला कोप-यावरच्या वृत्तपत्रविक्रेत्याच्या स्टॉलवर जायचे आहे.
‫من می خواهم به کیوسک بروم.‬
man mikhaham be kiusk beravam.
 
 
 
 
मला एक पुस्तक घ्यायचे आहे.
‫من می خواهم یک کتاب به امانت بگیرم.‬
man mikhaham yek ketab be amanat begiram.
मला एक पुस्तक खरेदी करायचे आहे.
‫من می خواهم یک کتاب بخرم.‬
man mikhaham yek ketab bekharam.
मला एक वृत्तपत्र खरेदी करायचे आहे.
‫من می خواهم یک روزنامه بخرم.‬
man mikhaham yek ruzname bekharam.
 
 
 
 
मला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचे आहे.
‫من می خواهم به کتابخانه بروم تا یک کتاب به امانت بگیرم.‬
man mikhaham be ketabkhane beravam ta yek ketab be amanat begiram.
मला एक पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे.
‫من می خواهم به کتابفروشی بروم تا یک کتاب بخرم.‬
man mikhaham be ketabforushi beravam ta yek ketab bekharam.
मला एक वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी कोप-यावरच्या स्टॉलवर जायचे आहे.
‫من می خواهم به کیوسک بروم تا یک روزنامه بخرم.‬
man mikhaham be kiusk beravam ta yek ruzname bekharam.
 
 
 
 
मला चष्म्याच्या दुकानात जायचे आहे.
‫من می خواهم به عینک فروشی بروم.‬
man mikhaham be eynak-forushi beravam.
मला सुपरमार्केटात जायचे आहे.
‫من می خواهم به سوپر مارکت بروم.‬
man mikhaham be supermarket beravam.
मला बेकरीत जायचे आहे.
‫من می خواهم به نانوایی بروم.‬
man mikhaham be nanva-yee beravam.
 
 
 
 
मला काही चष्मे खरेदी करायचे आहेत.
‫من می خواهم یک عینک بخرم.‬
man mikhaham yek eynak bekharam.
मला फळे आणि भाज्या खरेदी करायच्या आहेत.
‫من می خواهم میوه و سبزی بخرم.‬
man mikhaham mive va sabzi bekharam.
मला रोल आणि पाव खरेदी करायचे आहेत.
‫من می خواهم نان صبحانه و نان بخرم.‬
man mikhaham nane sobhane va nan bekharam.
 
 
 
 
मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचे आहे.
‫من می خواهم به عینک فروشی بروم تا یک عینک بخرم.‬
man mikhaham mikhaham be eynak-forushi beravam ta yek eynak bekharam.
मला फळे आणि भाज्या खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटात जायचे आहे.
‫من می خواهم به سوپر مارکت بروم تا میوه و سبزی بخرم.‬
man mikhaham be supermarket beravam ta mive va sabzi bekharam.
मला रोल आणि पाव खरेदी करण्यासाठी बेकरीत जायचे आहे.
‫من ‫می خواهم به نانوایی بروم تا نان صبحانه و نان بخرم.‬
man mikhaham be nanva-yee beravam ta nane sobhane va nan bekharam.
 
 
 
 
 


युरोपमधील अल्पसांख्यिक भाषा

युरोप मध्ये बर्‍याच वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. त्यापैकी सर्वाधिक इंडो-युरोपीय भाषा आहेत. मोठ्या राष्ट्रीय भाषा व्यतिरिक्त, अनेक लहान भाषा देखील आहेत. ते अल्पसांख्यिक भाषा आहेत. अल्पसांख्यिक भाषा या अधिकृत भाषांपेक्षा वेगळ्या असतात. पण त्या वाक्यरचना नाहीत. त्या स्थलांतरित लोकांच्या देखील भाषा नाहीत. अल्पसंख्याक भाषा नेहमी वांशिक चलित असतात. याचा अर्थ त्या विशिष्ट वांशिक गटांच्या भाषा आहेत. जवळजवळ युरोपच्या प्रत्येक देशात अल्पसंख्याक भाषा आहेत. युरोपियन युनियन मध्ये सुमारे 40 अशा भाषा आहेत. काही अल्पसंख्याक भाषा फक्त एकाच देशात बोलल्या जातात. त्यापैकी उदाहरण म्हणजे जर्मनी मध्ये सॉर्बियन ही भाषा आहे. दुसर्‍या अंगाला अनेक युरोपियन देशांमध्ये रोमानी भाषिक लोक आहेत. अल्पसंख्याक भाषेला एक विशिष्ट दर्जा आहे. कारण तुलनेने त्या फक्त लहान गटात बोलल्या जातात. हे गट त्यांच्या स्वतःच्या शाळा बांधू शकत नाहीत. त्यांना त्यांचे स्वत:चे साहित्य प्रकाशित करणे देखील कठीण जाते. परिणामी, अनेक अल्पसंख्यक भाषांचे अस्तित्व धोक्यात आहेत. युरोपियन युनियनला अल्पसंख्यक भाषांचे संरक्षण करावयाचे आहे. कारण प्रत्येक भाषा ही एका संस्कृतीचा किंवा ओळखीचा एक महत्वाचा भाग आहे. काही राष्ट्रांना राष्ट्रकुल नाही आणि ते फक्त अल्पसंख्यांक म्हणून अस्तित्वात आहेत. विविध कार्यक्रम आणि प्रकल्प हे त्यांच्या भाषा प्रोत्साहनासाठी असतात. अशी अशा आहे की, लहान वांशिक लोकांची संस्कृती जपली जाईल. तरीसुद्धा काही अल्पसंख्याक भाषा लवकरच अदृश्य होतील. यापैकी लिवोनिअन ही भाषा असून ती लाटविया या प्रांतात बोलली जाते. लिवोनिअन या भाषेचे मूळ भाषिक फक्त 20 लोक आहेत. असे असल्याने युरोपमधील लिवोनिअन ही भाषा सर्वात छोटी ठरते.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2015 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - फारशी नवशिक्यांसाठी