Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   व्हिएतनामी   >   अनुक्रमणिका


१८ [अठरा]

घराची स्वच्छता

 


18 [Mười tám]

Dọn dẹp nhà

 

 

 Click to see the text! arrow
  
आज शनिवार आहे.
आज आमच्याजवळ वेळ आहे.
आज आम्ही घर स्वच्छ करत आहोत.
 
 
 
 
मी स्नानघर स्वच्छ करत आहे.
माझे पती गाडी धूत आहेत.
मुले सायकली स्वच्छ करत आहेत.
 
 
 
 
आजी झाडांना पाणी घालत आहे.
मुले मुलांची खोली स्वच्छ करत आहेत.
माझे पती त्यांचे कामाचे टेबल आवरून ठेवत आहेत.
 
 
 
 
मी वॉशिंग मशीनमध्ये धुण्याचे कपडे घालत आहे.
मी धुतलेले कपडे टांगत आहे.
मी कपड्यांना इस्त्री करत आहे.
 
 
 
 
खिडक्या घाण झाल्या आहेत.
फरशी घाण झाली आहे.
भांडी-कुंडी घाण झाली आहेत.
 
 
 
 
खिडक्या कोण धुत आहे?
वेक्युमींग कोण करत आहे?
बशा कोण धुत आहे?
 
 
 
 


प्रारंभिक शिक्षण

आज परदेशी भाषा अधिक आणि अधिक महत्त्वाच्या होत आहेत. हे व्यावसायिक जीवनास देखील लागू आहे. परिणामतः, परदेशी भाषा शिकणार्‍या लोकांची संख्या वाढली आहे. अनेक पालकांना आपल्या पाल्याने विविध भाषा शिकलेल्या आवडतात. हे तरुण वयात उत्तम आहे. जगभरात आधीपासूनच अनेक आंतरराष्ट्रीय वर्ग शाळा आहेत. बहुभाषिक शिक्षणासह अंगणवाड्यादेखील अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे शिक्षणास लवकर प्रारंभ करण्याचे अनेक फायदे आहेत. हे मेंदूच्या विकासामुळे घडते. आपला मेंदू, 4 वर्षांचा होईपर्यंत भाषांसाठी रचना बनवितो. हे चेता जाळे शिकण्यास आपल्याला मदत करते. नंतरच्या आयुष्यात, नवीन रचनांची वाढही होत नाही. मोठ्या मुलांना आणि प्रौढांना भाषा शिकण्यात अधिक अडचण येते. त्यामुळे आपण आपल्या मेंदूची प्रगती लवकर केली पाहिजे. थोडक्यात: काम वयाचे असाल तितकेच चांगले. तथापि, काही लोक असतात की, लवकर शिकण्यावर देखील टीका करतात. त्यांना भीती वाटते की, बहुभाषिकपणा लहान मुलांना दडपून टाकू शकतो. त्या व्यतिरिक्त त्यांना हे भय असते की, ते कोणतीही भाषा व्यवस्थित शिकणार नाहीत. या शंका एका वैज्ञानिक दृष्टिकोनावर निर्धारित आहेत. भरपूर भाषातज्ञ आणि चेता-मानसशास्त्रज्ञ आशावादी आहेत. त्यांचा या विषयाचा अभ्यास सकारात्मक परिणाम दर्शवातो. मुलांना सहसा या भाषेच्या अभ्यासक्रमामध्ये मजा येते. आणि जर मुलांनी भाषेचा अभ्यास केला तर ते देखील भाषेचा विचार करतात. त्यामुळे परदेशी भाषा शिकून त्यांना त्यांची मूळ भाषा जाणून घेता येते. त्यांना या भाषांच्या ज्ञानामुळे संपूर्ण जीवनात फायदा होतो. कदाचित अधिक कठीण भाषांपासून सुरुवात करणे प्रत्यक्षात चांगले आहे. कारण लहान मुलाचे मेंदू एखादी गोष्ट जलद आणि अंत:प्रेरणेने आत्मसात करू शकतात. तो कुठले शब्द साठवतो याबद्दल काळजी करत नाही, जसे की, हॅलो, नमस्कार किंवा नेह हाऊ [néih hóu]!

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2017 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - व्हिएतनामी नवशिक्यांसाठी