Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   लिथुआनियन   >   अनुक्रमणिका


२७ [सत्तावीस]

हाटेलमध्ये – आगमन

 


27 [dvidešimt septyni]

Viešbutyje — atvykimas

 

 

 Click to see the text! arrow
  
आपल्याकडे खोली रिकामी आहे का?
मी एक खोली आरक्षित केली आहे.
माझे नाव म्युलर आहे.
 
 
 
 
मला एक बेड असलेली खोली हवी आहे.
मला एक डबल-बेड असलेली खोली हवी आहे.
एका रात्रीसाठी खोलीचे भाडे किती?
 
 
 
 
मला टबबाथची सोय असलेली खोली हवी आहे.
मला शॉवरची सोय असलेली खोली हवी आहे.
मी खोली पाहू शकतो / शकते का?
 
 
 
 
इथे गॅरेज आहे का?
इथे तिजोरी आहे का?
इथे फॅक्स मशीन आहे का?
 
 
 
 
ठीक आहे. मी खोली घेतो. / घेते.
ह्या किल्ल्या.
हे माझे सामान.
 
 
 
 
आपण न्याहारी किती वाजता देता?
आपण दुपारचे जेवण किती वाजता देता?
आपण रात्रीचे जेवण किती वाजता देता?
 
 
 
 


यश मिळविण्यासाठी विश्रांती आवश्यक आहे

ज्यांना यशस्वीपणे शिकायचे आहे त्यांनी सतत विश्रांती घ्यावी. नवीन वैज्ञानिक अभ्यासाचा हा निष्कर्ष आहे. संशोधक शिकण्याबाबतच्या प्रत्येक टप्प्यांचे विश्लेषण करत आहेत. असे करताना, वेगवेगळ्या शिकण्याच्या टप्प्यांची अनुकृति केली आहे. आपण माहिती लहान भागांमध्ये उत्कृष्टरीत्या ग्रहण करतो. म्हणजेच, एका वेळी आपण खूप सारे शिकू नये. आपण नेहमी शिकताना विश्रांती घ्यावी. आपले शिकण्याचे यश हे जीवरासायनिक प्रक्रियेवर देखील अवलंबून असते. ही प्रक्रिया मेंदूमध्ये घडत असते. ते आपल्या शिकण्याची गती निर्धारित करतात. आपण जेव्हा नवीन काहीतरी शिकतो, तेव्हा आपला मेंदू विशिष्ट पदार्थ सोडत असतो. हे पदार्थ आपल्या मेंदूच्या पेशी क्रियाशीलतेवर परिणाम करतात. दोन विविध प्रकारचे विकरे या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावतात. एखादी नवी संकल्पना शिकली की ते स्त्रवले जातात. परंतु, ते एकत्र स्त्रवले जात नाहीत. जसजसा वेळ पुढे जातो तसतसा त्यांचा परिणाम दिसून येतो. आपण तेव्हाच उत्कृष्ट शिकतो जेव्हा दोन्हीही विकरे एकाच वेळी उपस्थित असतात. आणि आपण जितकी अधिक विश्रांती घेऊ तितके आपले यश वाढत जाते. त्यामुळे वैयक्तिक शिकण्याच्या टप्प्यांमध्ये बदल करून त्यास अर्थ प्राप्त होऊ शकतो. विश्रांतीचे अंतर देखील बदलावयास हवे. सुरुवातीला 10 मिनिटांची दोनदा विश्रांती घेणे फायद्याचे ठरेल. त्यानंतर 5 मिनिटाची एक विश्रांती. त्यानंतर तुम्ही 30 मिनिटांची विश्रांती घेतली पाहिजे. विश्रांती दरम्यान, आपला मेंदू नवीन बाबी अधिक चांगल्या पद्धतीने आठवू शकतो. तुम्ही विश्रांती दरम्यान तुमच्या कामाची जागा सोडली पाहिजे. विश्रांती दरम्यान आजूबाजूला फिरणे ही देखील चांगली कल्पना आहे. म्हणून अभ्यास दरम्यान थोडे फिरून या. आणि वाईट वाटून घेऊ नका - तुम्ही ते करताना शिकत आहात!

 


Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - लिथुआनियन नवशिक्यांसाठी