Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   हिब्रू   >   अनुक्रमणिका


९९ [नव्याण्णव]

षष्टी विभक्ती

 


‫99 [תשעים ותשע]‬

‫יחסת הקניין‬

 

 

 Click to see the text! arrow
  
माझ्या मैत्रीणीची मांजर
माझ्या मित्राचा कुत्रा
माझ्या मुलांची खेळणी
 
 
 
 
हा माझ्या सहका-याचा ओव्हरकोट आहे.
ही माझ्या सहका-याची कार आहे.
हे माझ्या सहका-याचे काम आहे.
 
 
 
 
शर्टचे बटण तुटले आहे.
गॅरेजची किल्ली हरवली आहे.
साहेबांचा संगणक काम करत नाही.
 
 
 
 
मुलीचे आई-वडील कोण आहेत?
मी तिच्या आई-वडिलांच्या घरी कसा जाऊ शकतो?
घर रस्त्याच्या शेवटी आहे.
 
 
 
 
स्वित्झरलॅन्डच्या राजधानीचे नाव काय आहे?
पुस्तकाचे शीर्षक काय आहे?
शेजा-यांच्या मुलांची नावे काय आहेत?
 
 
 
 
मुलांच्या सुट्ट्या कधी आहेत?
डॉक्टरांशी भेटण्याच्या वेळा काय आहेत?
संग्रहालय कोणत्या वेळी उघडे असते?
 
 
 
 


चांगली एकाग्रता - चांगले शिक्षण

जेव्हा आपण शिकतो आपल्याला एकाग्र व्हावेच लागते. आपले सर्व अवधान एकाच गोष्टीवर पाहिजे. एकाग्र करण्याची क्षमता ही अंगभूत नसते. आपण पहिल्यांदा एकाग्र कसे व्हायचे ते शिकूयात. हे विशिष्ट शिशुविहार किंवा शाळेत होते. 6 व्या वर्षात मुले अंदाजे 15 मिनिटांसाठी एकाग्र होऊ शकतात. 14 वर्षांची किशोरवयीन मुले याच्या दुप्पट वेळ काम करू शकतात.आणि एकाग्र होऊ शकतात. मोठ्यांची एकाग्रतेची अवस्था ही अंदाजे 45 मिनिटांची असते. ठराविक वेळेनंतर एकाग्रता कमी होते. ज्यानंतर साहित्यातील शिक्षणाची रुची कमी होते. ते वैतागू शकतात किंवा त्यांचावर ताण येऊ शकतो. परिणामी अभ्यास अवघड होतो. स्मृतीही साहित्य चांगल्याप्रकारे टिकवू शकत नाही. मात्र एखादा व्यक्ती आपली एकाग्रता वाढवू शकतो. अभ्यासापूर्वी तुम्ही पुरेसे झोपलेले असणे खूप महत्वाचे आहे. व्यक्ती जो कंटाळलेला आहे तो थोड्या वेळासाठी एकाग्र होऊ शकतो. जेव्हा आपण थकलेलो असतो तेव्हा आपली बुद्धी खूप चुका करते. आपल्या भावनाही आपल्या एकाग्रतेवर परिणाम करतात. ज्या व्यक्तीला कार्यक्षमतेने शिकायचे आहे त्याचे चित्त उदासीन अवस्थेत असायला हवे. खूप सकारात्मक किंवा नकारात्मक भावना शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा ठरू शकतात. साहजिकच एखादा व्यक्ती आपले भाव आटोक्यात आणू शकत नाही. तुम्ही शिकत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू शकता. ज्या व्यक्तीला एकाग्र होयचे आहे त्याला प्रेरित असायला हवे. आपण शिकत असताना आपल्या मनात नेहमी ध्येय्य असायला हवे. मगच आपली बुद्धी एकाग्र होण्यास तयार होते. शांत वातावरणही चांगल्या एकाग्रतेसाठी महत्वाचे आहे. आणि : तुम्ही अभ्यास करताना भरपूर पाणी प्यायला हवे: ते तुम्हाला जागृत ठेवते. हे सर्व जो आपल्या डोक्यात ठेवेल तो नक्कीच स्वतःला खूप वेळासाठी एकाग्र ठेऊ शकेल.

 


Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - हिब्रू नवशिक्यांसाठी