Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   फारशी   >   अनुक्रमणिका


५६ [छप्पन्न]

भावना

 


‫56 [پنجاه و شش]‬

‫احساس ها‬

 

 
इच्छा होणे
‫تمایل به انجام کاری داشتن‬
tamâyol be anjâme kâri dâshtan
आमची इच्छा आहे.
‫ما تمایل به انجام کاری را داریم.‬
mâ tamâyol be anjâme kâri râ dârim.
आमची इच्छा नाही.
‫ما تمایل به انجام کاری را نداریم.‬
mâ tamâyol be anjâme kâri râ nadârim.
 
 
 
 
घाबरणे
‫ترس داشتن‬
tars dâshtan
मला भीती वाटत आहे.
‫من می ترسم.‬
man mitarsam.
मला भीती वाटत नाही.
‫من نمی ترسم.‬
man nemitarsam.
 
 
 
 
वेळ असणे
‫وقت داشتن‬
vaght dâshtan.
त्याच्याजवळ वेळ आहे.
‫او (مرد) وقت دارد.‬
oo vaght dârad.
त्याच्याजवळ वेळ नाही.
‫او (مرد) وقت ندارد.‬
oo vaght nadârad.
 
 
 
 
कंटाळा येणे
‫بی حوصله بودن‬
bi-hosele budan.
ती कंटाळली आहे.
‫او (زن) بی حوصله است.‬
oo bi-hosele ast.
ती कंटाळलेली नाही.
‫او (زن) حوصله دارد.‬
oo hosele dârad.
 
 
 
 
भूक लागणे
‫گرسنه بودن‬
gorosne budan.
तुम्हांला भूक लागली आहे का?
‫شما گرسنه هستید؟‬
shomâ gorosne hastid?
तुम्हांला भूक लागलेली नाही का?
‫شما گرسنه نیستید؟‬
shomâ gorosne nistid?
 
 
 
 
तहान लागणे
‫تشنه بودن‬
teshne budan
त्यांना तहान लागली आहे.
‫آنها تشنه هستند.‬
ânhâ teshne hastand.
त्यांना तहान लागलेली नाही.
‫آنها تشنه نیستند.‬
ânhâ teshne nistand.
 
 
 
 
 


गुप्त भाषा

आपण जे अनुभवतो आणि विचार करतो ते भाषेच्या साह्याने प्रकट करतो. म्हणून आकलन हा भाषेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. परंतु काहीवेळा प्रत्येकालाच समजायला हवे असे लोकांना वाटत नाही. अशा बाबींसाठी, त्यांनी गुप्त भाषेचा शोध लावला. हजारो वर्षांपासून गुप्त भाषेने लोकांना आकर्षित केले आहे. ज्युलिउस सिझर (Julius Caesar) याच्याकडे त्याची स्वतःची गुप्त भाषा होती. उदाहरणार्थ, तो त्याच्या साम्राज्याच्या प्रत्येक भागात सांकेतिक संदेश पाठवत असे. पाठवलेले सांकेतिक संदेश वाचण्यास त्याचे शत्रू असमर्थ होते. गुप्त भाषा म्हणजे दळणवळणाचे संरक्षण. गुप्त भाषेच्या साह्याने आपण इतरांपासून स्वतःला वेगळे करू शकता. आपण विशेष समूहामध्ये आहोत हे आपण दाखवून देतो. आपण गुप्त भाषेचा उपयोग का करतो यासाठी खूप कारणे आहेत. प्रेमी प्रेमपत्र नेहमी सांकेतिक भाषेत लिहितात. याखेरीज विशिष्ट उच्च व्यावसायिक समूहात त्यांच्या स्वत:च्या सांकेतिक भाषा होत्या. जादूगार, चोर आणि व्यापारी लोक यांच्यासाठी सांकेतिक भाषा होत्या. परंतु सांकेतिक भाषांचा उपयोग प्रामुख्याने राजकीय उद्दिष्टासाठी होत होता. जवळजवळ प्रत्येक युद्धाच्या वेळी सांकेतिक भाषा वापरल्या जात. लष्कर आणि गुप्तवार्ता संघटना यांच्याकडे स्वतःचे सांकेतिक भाषा तज्ञ होते. गुप्तलेखनशास्त्र हे संकेतनशास्त्र आहे. आधुनिक संकेत गणितातील किचकट सूत्रावर आधारित आहेत. परंतु त्यांचे विसंकेतन करणे खूप अवघड जाते. सांकेतिक भाषेशिवाय आपले जीवन अकल्पनीय आहे. सांकेतिक माहिती आज प्रत्येक ठिकाणी वापरली जाते. क्रेडिट कार्ड आणि ईमेल - सर्व काही सांकेतिक भाषेवर कार्य करतात. गमतीचा भाग म्हणजे, खासकरून लहान मुले सांकेतिक भाषेचा शोध लावतात. आपल्या मित्राबरोबर गुप्त भाषेत संदेशांची देवाणघेवाण करण्यास त्यांना आवडते. मुलांच्या विकासासाठीदेखील गुप्त भाषा उपयोगी ठरतात. ते कल्पनाशक्ती आणि भाषेविषयीची जाणीव यांना प्रेरणा देतात.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - फारशी नवशिक्यांसाठी