Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


५४ [चौपन्न]

खरेदी

 


‫54 [أربعة وخمسون]‬

‫التسوق‬

 

 
मला एक भेटवस्तू खरेदी करायची आहे.
‫أريد أن أشترى هدية.‬
oriid an ashtarii hadiya
पण जास्त महाग नाही.
‫ولكن أن لا تكون غالية كثيراً.‬
wa laken an laa takoon ghaaliya kathiran
कदाचित एक हॅन्ड – बॅग
‫ربما شنطة يد؟‬
robbamaa shantat ya?
 
 
 
 
आपल्याला कोणता रंग पाहिजे?
‫أي لون تحب؟‬
ayy lawn toheb?
काळा, तपकिरी, की पांढरा?
‫أسود، بني، أو أبيض؟‬
aswad,bonnii,aw abyath?
लहान की मोठा?
‫كبيرة أو صغيرة؟‬
kaboora aw saghiira?
 
 
 
 
मी ही वस्तू जरा पाहू का?
‫أتسمح لي أن أري هذه؟‬
atasmah lii an araa hathih?
ही चामड्याची आहे का?
‫هل هذه من جلد طبيعي؟‬
hal hathih men jeld tabiieii
की प्लास्टीकची?
‫أو هل هي من جلد صناعي؟‬
aw hal hiya men jeld sinaaii
 
 
 
 
अर्थातच चामड्याची.
‫من جلد طبيعي طبعاً.‬
men jeld tabiieii tabaan
हा खूप चांगल्या प्रतीचा आहे.
‫هذه نوعية ممتازة.‬
hathihi nawiia momtaza
आणि बॅग खरेच खूप किफायतशीर आहे.
‫والشنطة اليدوية سعرها فعلاً مناسب جداً.‬
wa elshanta elyadawiya searoha fealan monaaseb jerdan
 
 
 
 
ही मला आवडली.
‫هذه تعجبني.‬
hathihi tojibonii
ही मी खरेदी करतो. / करते.
‫سآخذها.‬
saakhothohaa
गरज लागल्यास मी ही बदलून घेऊ शकतो / शकते का?
‫هل يمكن أن أستبدلها إذا لزم؟‬
hal yomkin an astabdilaha idha lazem?
 
 
 
 
ज़रूर.
‫بالتأكيد.‬
betta'kiid
आम्ही ही भेटवस्तूसारखी बांधून देऊ.
‫نغلفها كهدية.‬
noghallifoha kahadiya
कोषपाल तिथे आहे.
‫هناك الصندوق [ الدفع].‬
honaaka elsondook[eddafa]
 
 
 
 
 


कोण कोणाला समजते?

या जगात अंदाजे 7 अब्ज लोक आहेत. सगळ्यांना एक भाषा तरी येते. दुर्दैवाने, ती नेहमीच सारखी नसते. म्हणून इतर देशांबरोबर बोलण्यासाठी, आपण भाषा शिकल्या पाहिजेत. हे बर्‍याच वेळा कठीण ठरतं. पण अशा काही भाषा आहेत ज्या एकसारख्या असतात. दुसरी भाषा न शिकता हे भाषिक एकमेकांची भाषा समजतात. या प्रकाराला परस्पर सुगमता असे म्हणतात. ज्याद्वारे दोन रूपांतील फरक स्पष्ट केला आहे. पहिले रूप मौखिक परस्पर सुगमता आहे. म्हणून, बोलणार्‍यांना एकमेकांचे फक्त तोंडी बोलणे समजते. तथापि, त्यांना दुसर्‍या भाषेतील लिखित रूप कळत नाही. असे घडते, कारण भाषांचे लिखित रूप वेगवेगळे असते. अशा भाषांचे उदाहरण म्हणजे हिंदी आणि उर्दू. लिखित परस्पर सुगमता हे दुसरे रूप आहे. या प्रकारात दुसरी भाषा ही लिखित स्वरुपात समजली जाते. परंतु भाषिकांना संवाद साधताना एकमेकांचे तोंडी बोलणे समजत नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांचे उचारण वेगळे असते. जर्मन आणि डच भाषा याचे उदाहरण आहे. अगदी जवळून संबंधित असलेल्या भाषांमध्ये दोन्ही रूपे असतात. म्हणजेच ते लिखित आणि मौखिक अशा दोन्ही रूपांत परस्पर सुगम असतात. रशियन आणि युक्रेनियन किंवा थाई आणि लाओटियन अशी त्यांची उदाहरणे आहेत. पण परस्पर सुगमतेचे प्रमाणबद्ध नसलेले रूपसुद्धा असते. त्याचे कारण असे कि, जेव्हा बोलणार्‍या लोकांची एकमेकांचे बोलणे समजून घेण्याची पातळी वेगळी असते. स्पॅनिश भाषिकांना जितकी पोर्तुगीज भाषा समजते त्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे पोर्तुगीजांना स्पॅनिश समजते. ऑस्ट्रियन्सना सुद्धा जर्मन चांगली समजते आणि याउलट जर्मनांना ऑस्ट्रियन भाषा व्यवस्थित समजत नाही. या उदाहरणंमध्ये, उच्चारण किंवा पोटभाषा हा एक अडथळा असतो. ज्यांना खरंच चांगले संभाषण करायचे असेल त्यांना काहीतरी नवीन शिकावे लागेल...

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2015 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी